Ad will apear here
Next
‘दरवाजा बंद, तर आजारपण बंद’
बीड : ‘दरवाजा बंद, तर आजारपण बंद’ या पत्रकाचे प्रकाशन नुकतेच बीड जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. ‘दरवाजा बंद’ म्हणजे शौचालयाचा नियमित वापर करणे. यासाठी बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत नवीन शौचालयांचे बांधकाम व शौचालयाचा नियमित वापर करण्याबद्दलच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. जिल्ह्याच्या हागणदारीमुक्तीसाठी अतिशय वेगाने काम सुरू आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार, तसेच विधानसभा व विधान परिषद आमदार यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. त्यात योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत बीड जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यात सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपले गाव व ग्रामपंचायत परिसरात उघड्यावरील शौचाची पद्धत बंद करावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

या वेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हेर, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, विनायक मेटे, आर. टी. देशमुख, संगीताताई ठोबंरे, लक्ष्मण पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्षा जयश्री म्हस्के, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZXSBD
Similar Posts
पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश बीड : बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला होता. यामुळे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुलाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण परळी   (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.  या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या
श्री माऊली हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा बीड : येथील श्री माऊली हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन श्री माऊली हॉस्पिटलतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब जनतेसाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली
पवारवाडी येथील स्वच्छतागृहांचे लोकार्पण माजलगाव (बीड) : येथील देवकृपा ग्रुपचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या पवारवाडी येथील ३० स्वच्छतागृहांचे लोकार्पण रविवारी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी गावकऱ्यांना या स्वच्छतागृहांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्या पंकजा मुंडे म्हणाल्या,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language